(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदु आवृत्ती !’

जम्मू-काश्मीर प्रकरणी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जळफळाट चालूच

जम्मू-काश्मीर प्रकरणी पाकला कोणीच भीक घालत नसल्याने आता इम्रान खान नेहमीप्रमाणे धर्माच्या आधारे पाकमधील जनतेचा तरी पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदु वर्चस्ववादाच्या विचारसरणीची मला भीती वाटत आहे; कारण नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये संचारबंदीची स्थिती आहे. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुसलमानांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल. हा प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदु आवृत्ती आहे, अशी गरळओक पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘ट्वीट’द्वारे केली. काश्मीरप्रश्‍नी जगभरातून पाकला कोणीच महत्त्व न दिल्याने हताश झालेल्या इम्रान खान यांनी अशा प्रकारचे आरोप केले आहेत.

‘काश्मीरची रचना पालटण्यासाठी जातीय हिंसाचार केला जात आहे. ज्याप्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातील देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही जग आज गप्प आहे’, असाही आरोप त्यांनी केला.

जगाला भारतापासून नव्हे, तर पाकपुरस्कृत आतंकवादापासून धोका ! – भाजप

इम्रान खान यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देतांना भाजपचे नेते आणि संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, ‘‘जगभरात आतंकवाद पसरवणारा पाकिस्तान किती सैरभर झाला आहे, हेच इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते. जगाला भारतापासून नव्हे, तर पाकपुरस्कृत आतंकवादापासून धोका आहे.

आम्ही महंमद अली जिना यांच्या २ राष्ट्रांचा आणि शेख अब्दुल्ला यांच्या ३ राष्ट्रांचा सिद्धांत संपवला आहे. इम्रान खान पाकमधील धार्मिक आतंकवाद संपवतील का ?’’


Multi Language |Offline reading | PDF