गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या गीताज्ञानदर्शन ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

श्री. अनंत आठवले

प्रकरण १ : गीताअध्याय

अर्जुनाला झालेला विषाद सांगणारा आणि विषादाला योग का म्हटले आहे, हे लेखकाने स्पष्ट केलेला

अध्याय १ – अर्जुनविषादयोग

२. अध्यायाला अर्जुनविषादयोग असे नाव देण्याचे कारण

२ आ. पुढच्या उन्नतीची पहिली पायरी ठरणारी श्रीरामांची विषण्णता

२ आ १. सर्व सुखोपभोग अशाश्‍वत वाटू लागणे : योगवासिष्ठ ग्रंथाच्या आरंभी असे आले आहे की, श्रीराम अतिशय उदास राहू लागले. त्याचे कारण विचारल्यावर तेेे म्हणाले, सुंदर वस्त्र, मिष्टान्ने, धनसंपत्ती, हत्ती, घोडे, रथ, विशाल राजवाडे, दास-दासी इत्यादी सर्व मिळाले, तरी हे सर्व उपभोगून काय लाभ होणार ? आणि हे सदैव टिकणारेही नाहीत.

२ आ २. विषण्ण झालेल्या श्रीरामांना विश्‍वामित्र आणि वसिष्ठ मुनींकडून ज्ञान मिळणे : साधनचतुष्टयातील पहिले साधन आहे, नित्यानित्यवस्तुविवेक, म्हणजे काय शाश्‍वत आहे आणि काय अशाश्‍वत आहे, याची विचाराने निश्‍चिती करणे. श्रीरामांची तशी मनःस्थिती झाल्यावर त्यांना प्रथम विश्‍वामित्र मुनींनी थोडेसे आणि नंतर वसिष्ठ मुनींनी ज्ञान दिले. म्हणजे श्रीरामांची विषण्णता ही पुढच्या उन्नतीची पहिली पायरी ठरली.  (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ गीताज्ञानदर्शन


Multi Language |Offline reading | PDF