गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

श्री. अनंत आठवले

७. महाभारतातील वैशिष्ट्यपूर्ण धर्मयुद्ध

ई. निर्णय घेण्याचा अधिकार अर्जुनालाच दिलेला असणे

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
     विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्‍लोक ६३

अर्थ : अशा प्रकारे हे गोपनियाहूनही अती गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या ज्ञानावर संपूर्णपणे विचार करून जशी तुझी इच्छा असेल, तसे कर.

स्पष्टीकरण : श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘कर्तव्य-अकर्तव्य, योग्यायोग्य, आत्म्याचे स्वरूप, मोक्षप्राप्तीचे मार्ग इत्यादी सर्व ज्ञान तुला दिले. त्यावर विचार करून आता तुझी इच्छा असेल तसे कर.’ श्रीकृष्णांनी आपले मत लादले नाही. ‘अमुकच कर’ अशी आज्ञा दिली नाही. निर्णय अर्जुनावरच सोपवला.

या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होईल कि अर्धवट माहितीच्या आधारे चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा गीतेचे नीट अध्ययन करून त्यातील ज्ञान आत्मसात् करणे रशियनांसह सर्वांच्या हिताचे आहे.’                                  (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले (२१.१२.२०१३)

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’  


Multi Language |Offline reading | PDF