आझम खान यांचे शीर कापून संसदेच्या दरवाजावर टांगा !- भाजपचे नेते आफताब अडवाणी यांची मागणी

रमा देवी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण

महिलांविषयी असा अनादर जर अन्य कोणी केला असता, तर एव्हाना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यास अटक केली गेली असती ! सामान्य लोकांना एक आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय आहे का ?

नवी देहली – समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी भाजपच्या खासदार तथा लोकसभेच्या कामकाजाच्या दरम्यान तात्पुरता कार्यभार स्वीकारलेल्या अध्यक्षा रमा देवी यांच्याविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. भारत सरकारला आमची विनंती आहे की, आझम खान यांचे शीर कापून संसदेच्या दरवाजाला टांगण्यात यावे. ज्यामुळे ‘आझम खान आणि ओवैसी यांच्यासारख्यांना महिलांचा अपमान केल्यास काय परिणाम होतात ?’, याची जाणीव होईल, असे विधान भाजपचे नेते आफताब अडवाणी यांनी केले. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा चालू असतांना आझम खान यांनी अध्यक्षपदी आसनस्थ असलेल्या रमा देवी यांच्याविषयी ‘तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पहात रहावेसे वाटते’, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान नुकतेच केले.

अडवाणी पुढे म्हणाले, ‘‘महिलांचा अपमान सहन करता कामा नये. यापूर्वी खान यांनी अभिनेत्री तथा खासदार जयाप्रदा यांच्याविषयीही आक्षेपार्ह विधान केले आहे. मी याआधीही म्हटले आहे की, आझम खान वेडे झाले आहेत. ते देशातील वातावरण दूषित करत आहेत. त्यांच्यापासून देशाला धोका आहे. त्यांच्यामुळे महिलांना अपमान सहन करावा लागतो आणि महिलांप्रती असणारा आदर दिवसेंदिवस न्यून होत असून हे देशासाठी चांगले नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF