५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ४३ टक्के घट

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

नवी देहली – नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात एप्रिल २०१४ ते मे २०१९ या ५ वर्षांच्या काळात त्या पूर्वीच्या ५ वर्षांच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिली. (गृहमंत्री अमित शहा यांनी शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने वाढता शहरी नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक) रेड्डी म्हणाले की, वर्ष २०१८ मध्ये केवळ ६० जिल्ह्यांत नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. यातही ६० जिल्ह्यांंपैकी केवळ १० जिल्ह्यांत हिंसाचाराच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF