तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पहात रहावेसे वाटते !

  • समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांचे लोकसभा अध्यक्ष रमा देवी यांना पाहून विधान

  • विधानावर क्षमा मागण्यास आझम खान यांचा नकार देत सभात्याग

आझम खान यांनी निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जया प्रदा यांच्यावरही अश्‍लील विधाने केली होती, यातून त्यांची मानसिकता लक्षात येते ! अशी अश्‍लील विधाने करणार्‍या लोकप्रतिनिधींना सभागृहातून बडतर्फ करण्याचा कायदा हवा !

नवी देहली – २५ जुलैला लोकसभेत तोंडी तलाक विधेयकावर चर्चा चालू असतांना समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान लोकसभा अध्यक्षांचा तात्पुरता कार्यभार स्वीकारलेल्या रमा देवी यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत रहावेसे वाटते.’’ या अश्‍लील विधानाचा भाजपच्या सदस्यांनी विरोध केला, तसेच रमादेवी यांनीही याला आक्षेप घेत हे विधान कामकाजातून वगळण्याचा आदेश दिला. त्या वेळी आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि ‘तुम्ही आदरणीय आहात, माझ्या बहिणीप्रमाणे आहात’, असे सांगण्याचा प्रयत्न केला. या वेळी सभागृहात गदारोळ झाला. त्याच वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार्यभार स्वीकारत आझम खान यांना क्षमा मागण्यास सांगितले; मात्र त्यांनी नकार देत सभात्याग केला. या वेळी त्यांच्या शेजारी बसलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खान यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (पक्षाचे अध्यक्षच अशा विधान करणार्‍यांचा बचाव करणारे असतील, तर पूर्ण पक्षच अशा मानसिकतेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी भरलेला असणार ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF