तोंडी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत संमत

नवी देहली – लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर तोंडी तलाकविरोधी विधेयक संमत झाले. आता हे विधेयक संमतीसाठी राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. या विधेयकाच्या बाजून ३०३ मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात ८२ मते पडली. या विधेयकाला विरोध दर्शवत जनता दल (संयुक्त), टीआरएस, वायएस्आर् काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्या खासदारांनी सभात्याग केला.

डिसेंबर २०१७ मध्ये लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आले होते आणि ते संमतही झाले होते; मात्र राज्यसभेत रखडले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्र सरकारने याविषयी नवीन अध्यादेश काढला आणि त्यानुसार पूर्वीचे विधेयक रहित करून नवीन विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत संमत करून घेतले; परंतु तेही राज्यसभेत प्रलंबित राहिले होते.


Multi Language |Offline reading | PDF