जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण

  • जमावाकडून होणार्‍या मारहाणीवरून हिंदूंना लक्ष्य करणारे धर्मांधांच्या या मारहाणीविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘आता अशा मारहाणीपासून संरक्षण होण्यासाठी हिंदूंनी परवाना असलेली शस्त्रे बाळगायची का?’, याचे उत्तर मुसलमानांना शस्त्र बाळगण्याचा सल्ला देणारे शिया धर्मगुुरु मौलान कल्बे जवाद देतील का ?
रस्ताबंद आंदोलन

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील मडियाहूं नगरातील कजियाना मोहल्ल्यामध्ये २१ जुलैच्या रात्री शुल्लक वादानंतर आरिफ आणि रियाझ या दोघा धर्मांधांनी विकास गौतम नावाच्या कावड यात्रेकरूला अमानुष मारहाण केली. त्यामुळे कावड यात्रेकरूंनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीसबळ मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. तसेच कावड यात्रेकरूंची समजूत काढून त्यांना मार्गस्थ करण्यात आले. पोलिसांनी धर्मांधांपैकी एकाला अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF