अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु तरुणाची हत्या

देशात सर्वत्र जमावाकडून होणार्‍या हत्यांवरून हिंदूंना लक्ष्य करण्यात येत असतांना धर्मांधांकडून होणार्‍या अशा प्रकारच्या हत्यांविषयी मात्र प्रसारमाध्यमांसह एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

अलवर (राजस्थान) – हकीमन नावाच्या मुसलमान महिलेला दुचाकी वाहनाची धडक बसल्यानंतर धर्मांधांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत हरिश नावाचा हिंदु दुचाकी चालक ठार झाला. ही घटना १६ जुलै या दिवशी फसला गावामध्ये घडली. धर्मांधांच्या मारहाणीत घायाळ झालेल्या हरिश याला प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर  देहलीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र उपचाराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हकीमन यांच्याकडून, तसेच हरिश यांच्या नातेवाइकांकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी ही जमावाकडून झालेली हत्या असल्याचे अमान्य केले आहे. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने तेथील पोलीस धर्मांधांच्याच बाजूने बोलणार ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF