भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २० जुलैच्या रात्री चारचाकी आणि दुचाकी यांवरून आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी भाजपचे नेते डॉ. बी.एस्. तोमर यांची गोळ्या झाडून हत्या केली. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असतांना मारेकर्‍यांनी हे आक्रमण केले. डॉ. बी.एस्. तोमर भाजपचे डासना क्षेत्राचे अध्यक्ष होते. ही हत्या गोतस्करांकडून करण्यात आल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. (गोरक्षकांनी केलेल्या किरकोळ मारहाणीवरून आकांडतांडव करणारे या हत्येविषयी का बोलत नाहीत ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF