जमावाकडून होणार्‍या मारहाणीपासून रक्षण होण्यासाठी शस्त्र बाळगा !

  • शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांचे चिथावणीखोर आवाहन

  • २६ जुलैला लक्ष्मणपुरी येथे सार्वजनिक कार्यक्रमात शस्त्र परवाना मिळवण्याविषयीचे मार्गदर्शन

  • यावरून अशांचा कायदा आणि पोलीस यांच्यावर विश्‍वास नाही, हे सिद्ध होते !
  • जमावाकडून केवळ मुसलमानांच्या हत्या होत नाहीत, तर हिंदूंच्याही सर्वाधिक हत्या होतात. त्यामुळे ‘हिंदूंनीही शस्त्र बाळगावे का ?, असा प्रश्‍न कोणी उपस्थित केल्यास चूक काय !
  • १-२ हत्या झाल्यावर मुसलमान लगेच शस्त्र बाळगण्याची भाषा करतात, तर काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलण्यात येऊनही, तसेच देशातील बहुसंख्य धर्मांध असलेल्या ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होत असतांनाही हिंदू असे आवाहन करत नाहीत, हे जाणा !
  • असे कुठल्या हिंदु नेत्याने म्हटले असते, तर एव्हाना हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, धर्मांध, पुरोगामी आदी त्यांच्यावर तुटून पडले असते.
  • हिंदूंच्या एखाद्या कार्यक्रमातील तलवार वाटपाच्या सूत्रावरून आकाश-पाताळ एक करणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जमावाकडून होणारी हत्या ही मुसलमानांच्या ‘एन्काऊंटर’चे (चकमकीत ठार करणे) नवे रूप आहे. यामुळे मुसलमानांनी जमावाकडून होणार्‍या मारहाणीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगले पाहिजे, असे चिथावणीखोर आवाहन शिया धर्मगुरु कल्बे जवाद यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले.

२६ जुलैला लक्ष्मणपुरी येथील इमामबाडा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘कायदेशीररित्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सरकारदरबारी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता महमूद प्राचा उपस्थित होते. प्राचा यांनीही काही दिवसांपूर्वी शस्त्र बाळगण्याविषयी विधान केले होते.

१. मौलाना कल्बे जव्वाद यांनी ‘जमावाकडून होणार्‍या हत्यांच्या विरोधात सरकारने कायदा करावा’, अशी मागणी केली. सरकार जर कायदा बनवण्यात अयशस्वी ठरले, तर आम्ही आयोजित करत आहोत, तसे कार्यक्रम इतरत्र आयोजित करून लोकांना कायदेशीर शस्त्र बाळगण्याविषयी माहिती देऊ. त्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनाही एकत्र आणावे.

२. प्राचा म्हणाले, ‘‘मुसलमानांच्या धर्मग्रंथांमध्ये स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती आहे, तशी ती भारतीय राज्यघटनेतही आहे. त्यासाठी परवाना घेऊन शस्त्र बाळगता येऊ शकते. या अभियानामध्ये दलितांनीही सहभागी व्हावे. शस्त्र खरेदीसाठी महागडी वस्तू विकावी लागली, तरी ती विकावी.’’

३. टीलेवाली मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल मन्नान म्हणाले की, आत्मरक्षण करण्याविषयी सर्व धर्मांमध्ये शिकवण्यात आले आहे. हे सूत्र कायद्याच्या दृष्टीने पाहून लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे.


Multi Language |Offline reading | PDF