आध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक

आध्यात्मिक क्षेत्रात शिरलेल्या भोंदूंना ओळखण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक !

मुंबई – आध्यात्मिक शक्तीद्वारे कौटुंबिक अडचणी सोडवणार असल्याचे सांगून लोअर परळ येथील एका दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरमाँ या महिलेला अटक केली आहे.

‘कौटुंबिक आणि नोकरी मधील अडचणींवर दैवी उपायाने मात करते’, असे सांगत तिने संबंधित कुटुंबियांकडून दागिने, चांगले कपडे आणि रोकड स्वरूपात १२ लाख ८० सहस्र रुपये उकळले; तसेच पूर्वजन्मीचा त्रास दूर करत असल्याचे सांगून फसवणूकही केली. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अटकेची कारवाई केली. महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा अन् जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याविषयी अन् त्यांचे मूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये पोलिसांनी गुरुमाँ यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF