‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते !

खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांचा ‘डार्विन सिद्धांत’ चुकीचा असल्याचा पुनरुच्चार

नवी देहली – ‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते; पण काही जण ‘आपण माकडांचे वंशज आहोत’, असे म्हणतात. मी अशा व्यक्तींच्या भावना दुखावू इच्छित नाही, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत ‘मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयका’वरील चर्चेत केले. डॉ. सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीही मानवी उत्क्रांतीविषयीच्या डार्विनच्या सिद्धांताला विरोध केला होता.

माझे पूर्वज ऋषि नसून शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ते माकडच होते ! – द्रमुकच्या खासदार कनिमोळी

द्रमुक पक्ष हिंदूविरोधी असल्याने खासदार कनिमोळी यांचे विचार असेच असणार !

सिंह यांच्या या विधानानंतर सभागृहात गदारोळ झाला. द्रमुकच्या खासदार कनिमोळी म्हणाल्या की, दुर्दैवाने माझे पूर्वज ऋषि नाहीत. शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ते माकडच होते. माझे आई-वडील शूद्र आहेत. त्यांचा जन्म कोणा देवापासून झालेला नाही. (हिंदु धर्मांकडे द्वेषाने पहाणारेच असे विधान करतात ! हिंदु धर्मानुसार शूद्र ही जात नसून वर्ण आहे. कोणताही वर्ण श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. सर्वच वर्ण समान आहेत; मात्र काही जणांनी स्वार्थापोटी वर्णांमधून जाती निर्माण करून भेदभाव निर्माण केला. आजही तेच केले जात आहे. त्यातून असा विरोध होत आहे. समाजाला धर्मशिक्षण दिले असते, तर असा विरोध झाला नसता ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF