देहलीमध्ये ६०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त

दोघा अफगाणी नागरिकांसह ५ जणांना अटक

नवी देेहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने येथील झाकीर नगरमधील एका कारखान्याच्या एका टोळीकडून ६०० कोटी रुपयांचे १५० किलो ‘हेरॉईन’ जप्त केले.  यातील ३ जणांना अटक करण्यात आली. यात २ जण अफगाणिस्तानी आहेत. यानंतर लाजपतनगर भागातून आणखी दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ महागड्या चारचाकी गाड्या, २ पिस्तुल आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या मते आतापर्यंत या टोळीने भारतात ५ सहस्र कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ आणले आहे.

१. ही टोळी अफगाणिस्तानमधून जिर्‍याच्या गोण्यांमधून ‘हेरॉईन’ देहलीमध्ये आणत होती. या गोण्या पाण्याच्या स्वरूपात असलेल्या ‘हेरॉईन’मध्ये बुडवून नंतर त्या वाळवल्या जात होत्या.

२. वाळवलेल्या गोण्यांमधून जिरे भारतात पाठवण्यात येत होते. देहलीत आल्यावर गोण्या रिकाम्या करून एका कारखान्यात विविध रसायनांमध्ये त्या भिजवून वाळवल्या जात होत्या. यामुळे गोण्यांमधील पाण्याच्या स्वरूपातील ‘हेरॉईन’ पावडरच्या स्वरूपात बनली जात होती. ही पावडर काढल्यानंतर गोणी जाळून टाकली जात होती. ‘हेरॉईन’ असलेल्या एका रिकाम्या गोणीचे मूल्य तब्बल ४ कोटी रुपये आहे. यात एक किलो हेरॉईन असते. ‘हेरॉईन’ची तस्करी करण्याचा हा नवीनच प्रकार समोर आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF