विजेची चोरी करणार्‍या धर्मांधाला २ वर्षे कारावास आणि सव्वा कोटी रुपयांचा दंड

सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीत अव्वल असलेले अल्पसंख्य !

मुंबई – वीजमीटरमध्ये फेरफार करून ५२ लाख ६५ सहस्र रुपयांच्या विजेची चोरी केल्याप्रकरणी ठाणे येथील अबूतालिक शमशुद्दीन खान या प्लास्टिक उत्पादक कारखानदाराला २ वर्षे सश्रम कारावास आणि सव्वा कोटी रुपयांचा दंड भरण्याची, तसेच दंड न भरल्यास १ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली आहे.

महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने १४ जानेवारी २००४ या दिवशी ठाण्यातील शीळ, महापे येथील आरोपी अबूतालिक खान याच्या प्लास्टिक उत्पादक कारखान्याची पडताळणी केली होती. तेव्हा संबंधित कारखान्याच्या वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. मीटरचे सील तोडून ३४ मासांपासून अनुमाने १० लाख ३२ सहस्र २६ युनिट विजेची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. विजेच्या चोरीची एकूण रक्कम ५२ लाख ६५ सहस्र ४३० रुपये होत असल्याने भरारी पथकाने अबूतालिक खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विद्युत् कलम १३५, १३८ नुसार गुन्हा प्रविष्ट केला होता. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने अबूतालिक खान याला शिक्षा सुनावली.


Multi Language |Offline reading | PDF