मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीतील ४१ पैकी ४० प्रकरणांत साक्षीदार उलटल्याने आरोपी मुक्त

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या दंगलीतील एकूण ४१ पैकी ४० प्रकरणांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. उत्तरप्रदेश सरकारने हत्येचे १० खटले प्रविष्ट केले होते. त्यामध्ये ठार झालेल्यांचे नातेवाईकच बहुतांश साक्षीदार होते. ते उलटल्याने न्यायालयाने या प्रकरणांतील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हत्येच्या केवळ एकाच खटल्यात आरोपींना दोषी ठरवले गेले आहे. या दंगलीत एकूण ६५ जण ठार झाले होते. कावल गावामध्ये २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सचिन आणि गौरव या चुलत भावांची हत्या करण्यात आल्याने दंगली उसळल्या होत्या. त्या प्रकरणातील मुझम्मील, मुजस्सीम, फुरकान, नदीम, जहांगीर, अफझल आणि इक्बाल या ७ आरोपींना सत्र न्यायालयाने ८ फेब्रुवारीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.


Multi Language |Offline reading | PDF