भ्रष्टाचाराच्या प्रकरणी गेल्या ५ वर्षांत १ सहस्र अधिकार्‍यांवर कारवाई

८६ ‘आएएस’, ‘आयपीएस्’ आणि  ‘आयएआरएस’ अधिकार्‍यांची चौकशी चालू

नवी देहली – भ्रष्टाचार आणि अनैतिक प्रकरणांत अडकलेल्या १ सहस्र ८३ अधिकार्‍यांना बडतर्फ केले आहे, तर ८६ भारतीय प्रशासकीय सेवा (आएएस्), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस्) आणि अंतर्गत महसूल सेवा (आयएआरएस ) अधिकार्‍यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी चालू करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभेत दिली.


Multi Language |Offline reading | PDF