धर्मांध लेखिका अशी कलिम यांच्याकडून ‘ट्विटर’वर हिंदूंच्या देवतांचे विडंबन

  • कुणा हिंदु लेखिकेने मुसलमानांच्या श्रद्धास्थानांविषयी असे लिहिले असते, तर एव्हाना देशात दंगली झाल्या असत्या आणि प्रसिद्धीमाध्यमांनीही आकांडतांडव केले असते. आता मात्र प्रसिद्धीमाध्यमे हे वृत्त का देत नाहीत ?
  • हिंदु सहिष्णु असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे इतके खालच्या स्तरावर जाऊन केलेले विडंबन सहन करतात. ‘हिंदूंच्या देवतांचा कितीही घोर अवमान केला, तरी हिंदू काहीही करणार नाहीत’, हे धर्मांधांना ठाऊक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंच्या देवतांची अशी घोर विटंबना केली जाते !

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – धर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्‍लाघ्य भाषेत टिपणी करून त्यांचा घोर अवमान केला. या विडंबनात्मक लिखाणामुळे समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे  पोलिसांनी ‘कलिम यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी २९५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे. कलिम यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (कलिम यांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे अश्‍लाघ्य कृत्य केले आहे. त्यामुळे पोलिसांनी नुसती बघ्याची भूमिका न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची मागणी आहे. – संपादक)

लेखिका अशी कलिम ‘ट्विटर’वर म्हणतात, ‘‘१६ सहस्र १ महिलांवर श्रीकृष्णाने बलात्कार केला होता, तसेच तो राधासमवेत ‘रिलेशनशिप’मध्ये (संबंधात) होता. सीतेचे स्वयंवर झाल्यानंतर तिचे अपहरण केले होते. त्यानंतर सीतेने अग्नीपरीक्षा दिल्यानंतर ती पळून गेली होती. सरस्वती आणि ब्रह्मदेव हे दोघे ‘रिलेशनशिप’मध्ये होते. शंकर आपल्याच मुलाचे धड का वेगळे करील ? वडील ब्रह्माने स्वतःची मुलगी सरस्वतीवर बलात्कार केला होता. लव आणि कुश यांचा वडील रावण आहे. सीता अरण्यात असतांना तिचा पती वाल्मीकि होता. त्यामुळे ज्या देवतांना त्यांच्या पत्नींची माहिती नाही, त्यांची पूजा करणे थांबवा. अशा देवतांच्या बलात्काराच्या अनेक गोष्टी, कथा आहेत.’’ (सहिष्णु हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करणार्‍या कलिम यांच्या विरोधात संघटित होऊन हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF