श्रीनगरमधील शिवमंदिरावर धर्मांधाचे अतिक्रमण

काश्मीरमधील हिंदूंना पळवून लावल्यावर हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवण्याचे काम केंद्र सरकारने प्राधान्याने करणे अपेक्षित आहे !

श्रीनगर – येथील रैनावारी भागात असणार्‍या शिवमंदिरावर स्थानिक अब्दुल मजीद याने अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या धर्मांधाचे या मंदिराला लागूनच घर आहे. प्रथम त्याने मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण केले आणि नंतर मंदिराच्या परिसरातील एक दुमजली इमारत पाडली.

या इमारतीत धर्मशाळा आणि २ दुकाने होती. येथे मंदिराचे सेवेकरी रहात होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी धर्मांधाला रोखले; मात्र त्याच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही आणि त्याला सोडून दिले. या संदर्भात ‘कश्मीर टेम्पल केयरिंग कमिटी’चे अध्यक्ष विजयकुमार झुत्शी यांनी प्रशासनाकडे तक्रार केली; मात्र मंदिर धर्मांधाच्या कह्यातून सोडवण्यात आलेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF