कांचीपूरम् येथे मंदिराच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४ जण ठार

हिंदूंच्या मंदिरांच्या मिरवणुकीचे नियोजन नीट होण्यासाठी प्रयत्न न करणारे पोलीस, प्रशासन आणि अण्णाद्रमुक सरकार या मृत्यूंसाठी उत्तरदायी आहेत !

कांचीपूरम् (तमिळनाडू) – येथील अथिवररदार मंदिरात मिरवणुकीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४ भाविक ठार झाले; मात्र ‘भाविकांची प्रकृती आधीच बिघडली असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला’, असा दावा मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केला आहे. (स्वतःच्या प्रशासनाची निष्क्रीयता आणि नियोजनशून्यता झाकण्याचाच हा अश्‍लाघ्य प्रयत्न आहे ! – संपादक) ‘या मंदिर परिसरात १८ जुलैला सुमारे १ लाख ७० सहस्र भाविक होते’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. ‘या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण न ठेवल्यामुळेच भाविकांचा बळी गेला’, अशी टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात केली. मृतांच्या वारसांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले.

अथिवररदार मंदिरात ४० वर्षांतून एकदा अथि देवतेची मूर्ती पाण्याबाहेर काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदा १ जुलैपासून हा सोहळा चालू झाला आहे. त्यामुळे मंदिरात सध्या प्रचंड गर्दी होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF