सामाजिक प्रसारमाध्यमांवर तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी धर्मांध अभिनेते एजाज खान यांना अटक

  • काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांना ठार केले. त्याचा सूड उगवण्यासाठी हिंदूंनी कधी आतंकवादी बनण्याची भाषा केली नाही, हे जाणा !
  • हिंदूंना लक्ष्य करू पहाणारे धर्मांध कधी स्वतःचा क्रूर इतिहास पडताळण्याचा प्रयत्न करत नाहीत. स्वतःला ‘पीडित’ असल्याचे भासवू पहाणारे धर्मांध हे ‘अत्याचारी’ आहेत, हे लक्षात घ्या !

मुंबई – झारखंड राज्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका मुसलमान युवकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणारे अभिनेते एजाज खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी एजाज खान यांच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला. एजाज खान यांनी २८ जून या दिवशी ‘टिक टॉक’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर हा ‘व्हिडिओ’ प्रसारित केला होता. यामध्ये त्यांनी ‘आता जर कोणी आतंकवादी झाला, तर काही बोलू नका’, असे आतंकवादाचे समर्थन करणारे आणि चिथावणी देणारे वक्तव्य केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF