केवळ संतांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे हा देश हिंदुस्थान राहिला आहे

 १. संतांच्या अविरत प्रयत्नांमुळे हा देश हिंदुस्थान राहू शकणे

‘संत ज्ञानेश्‍वरांपासून संत तुकारामांपर्यंत (४०० वर्षे), संत एकनाथांपासून गोंदवलेकर महाराज यांच्यापर्यंत (३०० वर्षे) आणि समर्थ रामदास स्वामींपासून श्रीधर स्वामींपर्यंतच्या (३०० वर्षे) ११०० वर्षांच्या मुसलमान राजवटीच्या खडतर काळात अनेक संत धर्म टिकवून ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न करत होते. त्यांनी धर्म जागता ठेवला; म्हणून आज हिंदु आणि हिंदुस्थान राहिला. ही त्या थोर संतांची मोठी पुण्याई, नाहीतर भारताचे अरबस्तान झाले असते. या प्रत्येकाचे चरित्र आम्ही वाचले आणि सर्वांनी अवश्य वाचावे.

२. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे ईश्‍वरही रक्षण करत असणे

अंतर्ज्ञानी गोंदवलेकर महाराज यांनी धर्मांधांनी पाठवलेले आणि एका फितूर शास्त्रींनी आणलेले जहाल विष पिऊन त्याचे भयंकर त्रास आणि यातना सोसल्या.  ‘धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो’, यानुसार झाले. राममूर्तीनी त्यांच्यासाठी आसवे ढाळली. जो त्यांची महानता लक्षात न घेता त्यांच्यावर आरोप करतो, त्याची पाळेमुळे भगवंतच उखडून टाकतो.

३. स्वतंत्र भारतात धर्मशून्य आणि धर्महानी करणारी माणसे निपजणे आणि धर्मयुद्धात त्यांना प्रायश्‍चित मिळणार असणे

स्वतंत्र भारतातील एकाही आई-वडिलांनी, शिक्षकाने, शास्त्र्यांनी, पुरोहिताने, विद्वान ब्राह्मणाने कुणालाही घडवले नाही. धर्म गुंडाळून ठेवला. समोरच्या पैशाकडे पहात पूजा-अचार्र् आणि कर्मकांडे केली. ज्ञानशून्य आणि धर्मशून्य माणसे घडवली. कुठेतरी पुण्याईचे शेपूट उरले आहे; म्हणून पुण्याई अजूनही तग धरून आहे.

– पुष्पांजली, बेळगाव (२.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF