गुरुपौर्णिमा स्मरणिकेविषयी केलेला सूक्ष्मातील प्रयोग आणि त्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती

गोवा राज्याच्या वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमा स्मरणिकेविषयी सूक्ष्मातील प्रयोग करण्यात आला. यात ‘स्मरणिकेच्या सुलट बाजूवर आणि उलट बाजूवर हात ठेवल्यावर काय जाणवले ?’, हे साधकांनी अभ्यासले. त्या वेळी ‘साधकांना काय जाणवले ?’, हे पुढे देत आहोत.

१. सूक्ष्मातील प्रयोग

२. स्मरणिकेवर सुलट बाजूने हात ठेवल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

अ. ‘संत भक्तराज महाराज यांचा तोंडवळा लालसर वाटला आणि ‘काळाला अनुसरून क्षात्रतेज (शक्ती) प्रक्षेपित होत आहे’, असे वाटले. तळहाताला गरम वाटले.’

– श्री. अभिजित सावंत, फोंडा, गोवा.

आ. ‘हातात पांढरा प्रकाश जात आहे’, असे वाटले. या चैतन्यदायी स्मरणिकेमुळे मनाची मरगळ अल्प होऊन उत्साही वाटले.’

– कु. सोहम सिंगबाळ, फोंडा, गोवा.

इ. ‘अनाहतचक्रावर उष्णता जाणवली.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ई. ‘संत भक्तराज महाराज यांच्या चरणांना स्पर्श करत आहे’, असे वाटले आणि पुष्कळ हलके वाटले.’ – श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. स्मरणिकेवर उलट बाजूने हात ठेवल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

अ. ‘हृदयाच्या ठोक्याप्रमाणे स्पंदने जाणवली.’ – सौ. अनुपमा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(असे बर्‍याच साधकांना जाणवले. – संकलक)

आ. ‘निर्गुण, निर्गुण’, असा नामजप आरंभ झाला.’ – सौ. वेदश्री गोरल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

इ. ‘उपायांची तीव्रता आणि उष्णतेचे प्रमाण वाढले. श्‍वासाला नामजप जोडला गेला आणि मनाला शांत वाटले.’

– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF