ऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे

रांची (झारखंड) – ‘फेसबूक’वर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह संदेश ‘शेअर’ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे. या प्रकरणातील चौकशी अधिकारी विनोद राम यांनी साहाय्यक लोक अभियोजक मीनाक्षी कुंडुलना यांच्या माध्यमातून न्यायदंडाधिकारी मनीषकुमार सिंह यांच्या न्यायालयात ‘कुराणाच्या प्रती वाटण्याचा आदेश मागे घ्यावा. या अटीमुळे अडचणी निर्माण होत आहे’, अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. न्याय दंडाधिकारी सिंह यांनी ही मागणी मान्य करत वरील अट मागे घेतली.

१. यापूर्वी ‘जिल्हा बार असोसिएशन’चे सचिव कुंदन प्रकाशन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने अधिवक्त्यांनी नवनीत कुमार यांची भेट घेऊन न्याय दंडाधिकारी मनीषकुमार सिंह यांचे स्थानांतर करण्याची मागणी केली होती, तसेच त्यांच्या न्यायालयावर २ दिवसांचा बहिष्कारही घातला होता.

२. दुसरीकडे ऋचा भारती यांचे वडील प्रकाश पटेल, अधिवक्ता विनोदकुमार साहू आदींनी पिठोरिया पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि उपअधीक्षक यांच्या विरोधात रांचीच्या महिला आयोगाकडे तक्रार केली.

३. अधिवक्ता विनोदकुमार साहू यांनी सांगितले की, ज्या प्रकारे ऋचा यांना अटक करण्यात आली, ती कायद्याच्या विरोधात आहे. अटक करणार्‍या पोलीस पथकामध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. रात्रीच्या वेळी एका महिलेला अटक करणे अयोग्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF