मायावती यांच्या भावाची ४०० कोटी रुपयांची भूमी जप्त

बसपच्या मायावती यांच्या भावाकडे इतक्या मूल्याची भूमी असेल, तर मायावती यांच्याकडे किती असेल ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात येणारच !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांची ४०० कोटी रुपये मूल्याची ७ एकर भूमी आयकर विभागाने जप्त केली आहे. ही भूमी नोएडा भागात आहे. आनंद कुमार यांच्या नावे आणखी बेनामी संपत्ती असून त्यावरही टाच येणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली.


Multi Language |Offline reading | PDF