उत्तरप्रदेश सरकार सर्व मदरशांची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवणार

मदरशात शस्त्रसाठा सापडल्यानंतरचा निर्णय

केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर देशातील सर्व संशयास्पद मदरशांची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – काही दिवसांपूर्वी राज्यातील बिजनौर येथील मदरशामधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यावर राज्य सरकारने प्रत्येक मदरशाची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जिल्हा अल्पसंख्यांक अधिकार्‍यांकडून खासगी आणि सरकारी सर्व मदरशांची माहिती मागवली आहे.

राज्यमंत्री मोहसीन रझा म्हणाले की, राज्यात असे अनेक मदरसे आहेत जे सरकारच्या नियामांनुसार नाहीत. त्यामुळे ते बंद करणे आवश्यक आहे. सरकार अशा मरदशांवर कारवाई करणार आहे.

एका मदरशाच्या चुकीमुळे सर्व मदरशांना लक्ष्य करणे अयोग्य ! – मदरशांच्या संचालकांचा कांगावा

सरकारच्या निर्णयास अनेक मदरशांच्या संचालकांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बिजनौर येथील घटना चुकीचीच होती; मात्र एका मदरशाच्या चुकीमुळे सर्व मदरशांना लक्ष्य करणे अयोग्य आहे. (येथे लक्ष्य करण्याचा प्रश्‍नच येत नाही. अशी घटना अन्य मदरशांत होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतात अनेक मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे यापूर्वी वेळोवेळी उघड झाले आहे. याविषयी मदरसा संचालक का बोलत नाहीत ? बिजनौर येथील मदरशाच्या संचालकाचाच शस्त्रसाठ्याच्या प्रकरणात हात होता. ‘जो कोणी मदरसा संचालक या निर्णयाला विरोध करत असेल, त्याचीही सरकारने चौकशी केली पाहिजे’, अशी मागणी कोणी केल्यास चूक काय ? – संपादक)

न्य एका मदरशाचे संचालक मौलाना हारून म्हणाले की, सरकारच्या दृष्टीसमोर केवळ मदरसेच असतात, त्यांनाच लक्ष्य केले जाते. उलट सरकारने मदरशांची स्थिती अधिक चांगली करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केले पाहिजे. (मदरशांची स्थिती चांगली करण्यापूर्वी तेथील देशविरोधी कारवाया रोखल्या पाहिजेत ! चीनमध्ये अशी घटना घडली असती, तर तेथील सर्व मदरसे बंद करून तेथील संचालक आणि विद्यार्थी यांना नजरबंद करण्यात आले असते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF