मुसलमान महिलेला धर्मांध घरमालकाकडून घर सोडण्याचा आदेश

• हनुमान चालिसाच्या पठणात सहभागी झाल्याचा राग

• महिलेला ठार मारण्याचीही धमकी

  • धर्मांधांना सर्वधर्मसमभाव चालत नाही का ? कि ‘सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घ्यायचा’, असे त्यांना वाटते ? याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, महिला आयोग गप्प का ?
  • ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून धर्मांधांना होणार्‍या कथित मारहाणीच्या बातम्या रंगवणारी प्रसारमाध्यमे अशा बातम्यांविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात !
  • इफ्तार पार्ट्यांची मेजवानी आयोजित करणार्‍या तथाकथित हिंदूंना याविषयी काय म्हणायचे का ?

हावडा (बंगाल) – येथे सामूहिक हनुमान चालिसाच्या पठणात सहभागी झाल्यामुळे इशरत जहां नावाच्या महिलेला ती रहात असलेल्या घराच्या मनाजीर हुसेन नावाच्या मालकाने घर सोडण्यास सांगितले. धर्मांधांनी इशरत जहां यांच्या घराबाहेर गर्दी करत त्यांनी घर सोडून जाण्याविषयीच्या घोेषणा दिल्या. इशरत यांना काही जणांकडून ठार मारण्याचीही धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर त्यांनी पोलिसांकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. इशरत भाजपची कार्यकर्ती आहे.

इशरत या डबसन मार्गावरील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात झालेल्या हनुमान चालिसाच्या पठणामध्ये सहभागी झाल्या होत्या. काही धर्मांधांनी इशरत यांनी बुरखा घालून हनुमान चालिसाच्या पठणात सहभागी झाल्यावरून आक्षेप घेतला. इशरत जहां यांनीच सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF