३१ जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करा !

  • रामजन्मभूमी प्रकरण

  • सर्वोच्च न्यायालयाचा मध्यस्थ समितीला आदेश

  • २ ऑगस्टपासून प्रतिदिन सुनावणी होण्याची शक्यता

नवी देहली – रामजन्मभूमी प्रकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीने तिचा अहवाल १८ जुलै या दिवशी न्यायालयाला सादर केला. यावर न्यायालयाने ‘अंतिम अहवाल ३१ जुलैपर्यंत सादर करावा’, असा आदेश समितीला दिला. त्यानंतर ‘या प्रकरणावर मध्यस्थ समितीच्या माध्यमातून तोडगा काढायचा कि प्रतिदिन सुनावणी करायची ?, यावर निर्णय घेण्यात येईल’, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘प्रतिदिन सुनावणी करायचे ठरले, तर २ ऑगस्टपासून ही सुनावणी चालू करण्यात येईल’, असेही न्यायालयाने सांगितले.

काही दिवसांपूर्वी एक पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यात त्यांनी ‘मध्यस्थ समितीकडून अंतिम तोडगा निघणे अत्यंत कठीण दिसत आहे. मध्यस्थ समिती केवळ वेळकाढूपणा करत असून न्यायालयाने स्वत: प्रतिदिन सुनावणी करावी’, अशी मागणी केली होती.


Multi Language |Offline reading | PDF