‘५ जी नेटवर्क’मुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – रशियातील वाहिनीचा दावा

मॉस्को (रशिया) – काही दिवसांपूर्वी ‘रशियन टाइम्स’ या वाहिनीच्या एका कार्यक्रमात तज्ञांनी ‘५ जी नेटवर्क’ हे मानव आणि प्राणी यांच्या जीवाला धोका आहे’, असे म्हटले आहे. या ‘नेटवर्क’मुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होणार आहेत. यातील ‘रेडिएशन्स’मुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व आणि ‘अल्झायमर’ यांसारखे विकार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. वैज्ञानिकांनी मात्र या दाव्याला दुजोरा दिलेला नाही, तसेच या वाहिनीनीने याविषयीचे काही पुरावेही सादर केलेले नाहीत. सध्या दक्षिण कोरियामध्ये ‘५ जी नेटवर्क’चा वापर चालू झाला आहे, तर चीनमध्ये त्यास अनुमती मिळाली आहे.

वर्ष २०१४ मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने ‘भ्रमणभाष संचामुळे कोणताही धोका नाही’, असे सांगितले होते. तथापि आता याच संघटनेने ‘आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थे’(आयएआर्सी)चा संदर्भ देत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स’मुळे कर्करोगाचा धोका आहे’, असे सांगितले आहे. भ्रमणभाषमध्ये हीच ‘फ्रिक्वेन्सी’ वापरली जाते.


Multi Language |Offline reading | PDF