देशाच्या भूमीवरून सर्व घुसखोरांना बाहेर काढू ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – देशाच्या भूमीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर रहातात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढले जाईल. आम्ही ज्या संकल्पपत्राच्या आधारे निवडून आलो आहोत, त्यामध्ये या सूत्राचा समावेश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी केले. आसाममध्ये लागू असलेली ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ (एन्आर्सी) आसाम कराराचा भाग आहे, असे शहा म्हणाले.

शहा पुढे म्हणाले की, एन्आर्सी लागू करण्यामागील सरकारचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. काही भारतियांना भारतीय नागरिक मानले गेलेले नाही. अशा

२५ लाख लोकांचे अर्ज राष्ट्रपती आणि सरकार यांच्याकडे आले आहेत, तर देशाबाहेरून आलेल्या काहींना एन्आर्सीच्या अंतर्गत भारतीय मानले गेले आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे थोडा वेळ मागण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF