विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित रहाण्यावर त्यागपत्रे दिलेल्या आमदारांनी स्वतःच निर्णय घ्यावा ! – सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता

नवी देहली – कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी उद्या १८ जुलैला विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहेत. ‘या वेळी त्यागपत्रे दिलेल्या आमदारांनी उपस्थित रहायचे कि नाही, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा. विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित रहाण्यासाठी त्यांच्यावर  कोणतीही बळजोरी केली जाऊ शकत नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशामुळे १८ जुलै या दिवशी होणार्‍या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी राज्यातील काँग्रेस-जेडीएस् यांचे आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळण्याची शक्यता आहे.

‘विधानसभेच्या सदस्यत्वाची दिलेली त्यागपत्रे स्वीकारण्याचा आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर्. रमेशकुमार यांना द्यावेत’, अशी मागणी काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षांच्या १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.


Multi Language |Offline reading | PDF