युएईमधून प्रत्यार्पण झालेल्या १४ भारतीय जिहाद्यांचे देशात इस्लामिक स्टेटचे केंद्र उभारण्याचे प्रयत्न उघड

अशांना अनेक वर्षे पोसत बसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगतीने खटला चालवून सर्वांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

नवी देहली – गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीने (‘युएई’ने) १४ भारतीय जिहाद्यांचे प्रत्यार्पण करत त्यांना भारताच्या कह्यात दिले होते. तत्पूर्वी युएईने त्यांना ६ मास कारागृहात ठेवले होते. हे सर्वजण भारतात सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी भारतात इस्लामिक स्टेटचे केंद्र उभारण्याचा प्रयत्न करत होते, असे उघड झाले आहे. एन्आयएन्ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) त्यांना कह्यात घेऊन चेन्नई येथील न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना २५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर एन्आयएने हरिश महंमद आणि हसन अली या दोघांना अटक केली. हसन अली हा इस्लामिक स्टेटचा ‘ऑपरेटिव्ह’ (संघटना चालवणारा) असून भारतावर आक्रमण करण्यासाठी तो तरुणांची भरती करत होता.

१. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार युएईने सोपवलेले सर्वजण चांगली नोकरी करणारे होते. यामधील एकजण तर गेल्या ३२ वर्षांपासून दुबईत रहात होता. त्याने जाणीवपूर्वक आतंकवादी आक्रमणासाठी निधी गोळा केला.

२. या टोळीने सामाजिक माध्यमांमध्ये ‘व्हिडिओ’द्वारे वाहनांचा वापर करत किंवा स्फोटके अन् विष यांचा वापर करत आक्रमण करण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांना केले होते.

३. या सर्वांनी अल्-कायदा या आतंकवादी संघटनेला पाठिंबा दिला होता, तसेच येमेनमधील आतंकवादी संघटनेशीही त्यांचे संबंध होते.


Multi Language |Offline reading | PDF