आतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक

पाकने हाफीजला केलेली अटक ही धूळफेकच आहे, हे शेंबडे पोरही सांगेल ! पाकला खरोखर आतंकवाद्यांवर कारवाई करायची असती, तर हाफीजला केव्हाच अटक करून फासावर लटकवले असते !

इस्लामाबाद – पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला तो लाहोरहून गुजरांवाला येथे जात असतांना अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफीजच्या विरोधात आतंकवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार करणे, या आरोपांखाली त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यापूर्वी ‘आम्ही आतंकवाद्यांवर कारवाई करतो’, हे दाखवण्याचा पाकचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF