मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने एका महाविद्यालयातील पुस्तकातून कारगिल युद्धावरील धडा वगळला !

गांधीवादी काँग्रेसच्या राज्यात सैनिकांचा अवमान ! राष्ट्राभिमान नसलेला काँग्रेस पक्ष राज्य करण्याच्या पात्रतेचा आहे का ?

भोपाळ – मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारने महाविद्यालयातील अभ्यासक्रमातील पुस्तकातून कारगिल युद्धाचा धडा वगळला आहे.

१. भोपाळमधील ‘एम्व्हीएम् सायन्स महाविद्यालया’त सैन्य विभाग आहे. या विभागाच्या वर्ष २०१९-२० या वर्षासाठी असलेल्या पुस्तकातील कारगिल युद्धाचा धडा वगळण्यात आला आहे. वर्ष २०१७-१८ च्या पुस्तकात हा धडा समाविष्ट होता.

२. महाविद्यालयाने १५ ते २० जणांची एक समिती नेमून अभ्यासक्रमाचा आढावा घेतला होता. या समितीने सादर केलेल्या अहवालात काही पालट सुचवले होते. त्यात म्हटले होते की, कारगिल युद्धाविषयी पुस्तके मिळत नसल्याने हा धडा वगळण्यात यावा.

३. यावर भाजपने आक्षेप घेत टीका केली आहे. भाजपने म्हटले आहे की, ‘तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात कारगिल युद्ध झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या आदेशानेच हा धडा वगळण्यात आला आहे. ‘पुढील पिढीला शौर्याची गाथा माहिती होऊ नये’, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.’


Multi Language |Offline reading | PDF