इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘शॅम्पेन’ उडवल्यावर मुसलमान खेळाडू त्यांच्यापासून दूर गेले !

  • क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा

  • इस्लाममध्ये मद्य वर्ज्य असल्याने केली कृती !

किती हिंदु खेळाडू मद्यापासून स्वतःला लांब ठेवतात, हा संशोधनाचाच विषय ठरील !

लंडन – ब्रिटनमध्ये झालेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा अंतिम सामान्यात पराजय करून विश्‍वचषक जिंकला. १४ जुलैला झालेल्या या सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळी त्यांनी ‘शॅम्पेन’ (एकप्रकारचे मद्य) उडवले. त्या वेळी इंग्लंड संघातील पाकिस्तानी वंशाचे खेळाडू मोईन अली आणि आदील राशीद हे संघातील अन्य खेळाडूंपासून दूर गेले. या घटनेचे छायाचित्रे आणि व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहेत. हे दोघे मुसलमान असल्याने आणि त्यांच्या धर्मात मद्य वर्ज्य असल्याने त्यांनी दूर जाणे पसंत केले. याआधीही त्यांनी असे केले होते.

यापूर्वी काही मुसलमान खेळाडूंनी मद्याच्या ब्रॅण्डचा लोगो पोशाखावर (‘जर्सी’वर) वापरण्यास नकार दिला आहे. यामध्ये हाशिम आमला, इम्रान ताहिर, ताब्राईज शम्सी, फवाद अहमद, राशीद खान अशा खेळाडूंची उदाहरणे आहेत. अमलाने जर्सीवर ‘कॅसल’ ब्रॅण्डचा लोगो वापरण्यास नकार दिला होता. त्याने यासाठी दंडही भरला होता.


Multi Language |Offline reading | PDF