(म्हणे) ‘भारतातील जमावाकडून मुसलमानांच्या होणार्‍या हत्या लज्जास्पद !’ – ब्रिटीश खासदार जॉनसन अशवर्थ

हत्या रोखण्यासाठी भारत सरकारला सल्ला देण्यासाठी ब्रिटन सरकारला पत्र

ब्रिटीश खासदारांनी भारतातील अंतर्गत प्रश्‍नांची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःच्या देशांतील समस्यांकडे लक्ष द्यावे !

भारतात गेल्या ७२ वर्षांत धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या हत्यांच्या वेळी ब्रिटीश खासदारांनी कधी त्यांच्या सरकारला पत्र का लिहिले नाही ? काश्मीरमधून हिंदूंना मशिदींमधून धमक्या देऊन पळवून लावले, सहस्रो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या त्या वेळी ब्रिटीश खासदार का बोलले नाहीत ?

लंडन – भारतात मुसलमानांवर होणारी आक्रमणे आणि जमावाकडून होणार्‍या हत्यांसारख्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. या आक्रमणांत मुसलमानांचा मृत्यू होतो, काहींना गंभीर मारहाण करण्यात येते. या गोष्टीं चिंताजनक आहेत. क्षुल्लक कारणांवरून दंगली उसळणे, भेदाभेद होणे, तोडफोड केली जाणे या घटनाही यासमवेत  घडत आहेत. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता या घटना रोखण्यासाठी ब्रिटन सरकारने लक्ष घालावे आणि मोदी सरकारला यासाठी सल्ला द्यावा, अशी मागणी लंडन येथील लेबर पार्टीचे खासदार जॉनसन अशवर्थ यांनी ब्रिटन सरकारला पत्र लिहून केली आहे. भारतात घडणार्‍या या घटना लाज आणणार्‍या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF