डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू

मुंबई – येथील डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ढिगार्‍याखालील लोकांना वाचवण्यासाठी अग्नीशमन पथक आणि एन्डीआर्एफ् यांनाही बोलावण्यात आले. ढिगार्‍याखाली अनुमाने ४० जण अडकल्याची शक्यता आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. १६ जुलैला सकाळी ११.४० वाजता ही दुर्घटना घडली आहे.


Multi Language |Offline reading | PDF