मुंबईत तीन तरुणांकडून वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलीस कर्मचार्‍याचेच अपहरण होणे लज्जास्पद नव्हे का ?

अटक केलेले गौरव पंजवानी आणि विराज शिंदे

मुंबई – घाटकोपर येथील छेडानगर येथून तीन तरुणांनी १६ जुलैला सकाळी १०.३० वाजता वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहतूक पोलिसाची सुटका केली असून संबंधित तीन तरुणांपैकी दोन तरुणांना अटक केली आहे.

वाहतूक पोलीस कर्मचारी विकास मुंडे

अटक केलेल्यांपैकी दोघांची नावे विराज शिंदे आणि गौरव अशी आहेत, तर राज नावाचा युवक पळून गेला आहे. तीन तरुणांनी चारचाकी रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. तरुण पळून जाऊ नयेत, यासाठी ते आतमध्ये जाऊन बसले; मात्र तरुणांनी गाडी चालू करून पळ काढला. शेवटी पोलिसांनी रमाबाई आंबेडकरनगर परिसरात गाडी अडवली.


Multi Language |Offline reading | PDF