५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील चि. दैविक रवींद्र कानडे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. दैविक कानडे हा एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा, १६.७.२०१९) या दिवशी चि. दैविक रवींद्र कानडे याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि साधक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. दैविक कानडे

चि. दैविक कानडे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

‘चि. दैविक पोटात असतांना मी श्रीमद्भगवद्गीता वाचली होती. मी प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा अन् अथर्वशीर्ष यांचे पठण करत होते.

२. जन्म ते २ वर्षे

२ अ. शांत स्वभाव

१. त्याचे नामकरण गोकुळाष्टमीच्या दिवशी केले. तेव्हा तो शांत राहून हसत होता. त्या वेळी सर्व नातेवाइकांनी त्याला घेऊन छायाचित्रे काढली; पण तो जराही रडला नाही.’

– सौ. प्रियांका कानडे (आई), उमरखेड, जिल्हा यवतमाळ.

२. ‘तुला गोष्ट सांगू का ?’, असे विचारल्यावर तो ती शांतपणे ऐकतो.

२ आ. त्याला काहीही सांगितले की, तो स्थिर राहून ऐकतो आणि आणि तशी कृती करतो.’

– सौ. सारिका परसनकर (मावशी), नांदगाव, अमरावती.

२ इ. व्यवस्थितपणा : ‘तो घेतलेली वस्तू परत जागेवर नेऊन ठेवतो. त्याचे खेळणे झाल्यावर तो खेळणे जागेवर नेऊन ठेवतो.’ – सौ. ललिता लहाबर (आजी (आईची आई)) आणि श्री. देवीदास लोभाजी कानडे (काका)

२ ई. ‘त्याला पाणी वाया गेलेले आवडत नाही. पाण्याची टाकी भरल्यावर तो लगेच नळ बंद करायला सांगतो.’ – श्री. देवीदास लोभाजी कानडे

२ उ. ‘त्याचे आजोबा अंघोळीला गेल्यावर तो ‘टॉवेल’ घेऊन बाहेर उभा रहातो.’ – सौ. सारिका परसनकर

२ ऊ. ‘त्याला सात्त्विक व्यक्तींजवळ रहायला आवडते.’ – श्री. देवीदास लोभाजी कानडे

२ ए. देवाची ओढ असणे

१. ‘माझे सासरे आरती करत असतांना आरती पूर्ण होईपर्यंत तो टाळ्या वाजवतो. त्याला तबला वाजवायला आवडते. तो टाळही छान वाजवतो. तो कितीही दूर असला, तरीही आरती करायला धावत येतो.’ – सौ. प्रियांका कानडे आणि श्री. देवीदास लोभाजी कानडे

२. ‘तो देवाला साष्टांग नमस्कार घालतो.’ – सौ. प्रियांका कानडे

३. ‘त्याला कृष्णाचे गाणे ऐकायला आणि त्यावर ताल धरून नाचायला फार आवडते.

४. तो श्रीमद्भगवद्गीता हातात घेऊन त्यातील कृष्णाच्या चित्राला नमस्कार करतो. तेव्हा ‘तो कृष्णाशी बोलत आहे’, असे वाटते.’

– श्री. देवीदास लोभाजी कानडे

५. ‘दैविकला नामजप करायला फार आवडते. कृष्णाचा नामजप केला की, तो कितीही रडत असला, तरी शांत रहातो. तो मन लावून नामजप ऐकतो आणि हसतो.’ – सौ. ललिता लहाबर

३. चि. दैविकची अन्य वैशिष्ट्ये

अ. ‘त्याचे डोळे फार तेजस्वी वाटतात.’ – सौ. प्रियांका कानडे

आ. ‘त्याचे केस सोनेरी आहेत.

इ. त्याची त्वचा मऊ आहे.

ई. त्याच्या हसण्यात वेगळेपण आहे. तो हसतांना ‘त्याच्याकडेच बघत रहावे’, असे वाटते.’

– श्री. देवीदास लोभाजी कानडे

४. ‘मी सेवेनिमित्त त्याच्या आजीकडे गेले होते. तेव्हा त्याला पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. त्या वेळी ‘हा दैवी बालक आहे’, असे मला आतून वाटले.’ – सौ. भक्ती चौधरी, वर्धा

५. अनुभूती

चि. दैविकने डास मारायचे औषध प्यायल्यावर त्याची प्रकृती गंभीर होणे, त्यानंतर त्याला बरे वाटणे आणि ‘देवानेच त्याचे या संकटातून रक्षण केले’, असे जाणवणे : ‘एकदा दैविक डास मारायचे औषध (‘ऑल आऊट’) प्याला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘त्याचे ७२ घंटे फार कठीण आहेत’, असे सांगितले. तेव्हा त्याची आई त्याच्याजवळ नव्हती. तो रुग्णालयात त्याची आजी आणि वडील यांच्या समवेत शांतपणे राहिला. रुग्णालयात असतांना त्याने जराही त्रास दिला नाही. त्यानंतर त्याला बरे वाटले. तेव्हा ‘देवानेच त्याचे या संकटातून रक्षण केले’, असे मला जाणवले. – सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर, वर्धा

६. स्वभावदोष

६ अ. ‘हट्टीपणा

६ आ. भीती वाटणे : तो कर्कश आवाजाला घाबरतो.’

– सौ. प्रियांका कानडे आणि श्री. देवीदास लोभाजी कानडे

(१९.६.२०१९)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF