हिंदुजागृती ही काळाची आवश्यकता !

‘कुत्र्याला पिसाळलेला म्हणा आणि ठार मारा’, अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहेे. तोच भाग धर्मांधांकडून होत असल्याचे पाळधी (जळगाव) आणि धुळे येथील घटनांवरून लक्षात आलेे. पाळधी (जळगाव) येथे १० जुलै या दिवशी एका अनोळखी व्यक्तीने धर्मांध मुलीचा हात धरून ‘भ्रमणभाषवर संपर्क कर, न केल्यास पाहून घेईन’, अशी चेतावणी दिल्याचे धर्मांधांचे म्हणणे आहे. या घटनेवरून धर्मांधांनी ११ जुलै या दिवशी संशयिताला अटक व्हावी म्हणून पाळधी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. गुन्हा नोंद करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर धर्मांध माघारी परतले.

या घटनेची सत्यता पडताळून पाहिली असता वास्तव परिस्थिती वेगळीच आहे. २०० ते ३०० जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा दिल्या. ‘अभी जमा हुए है, तो कुछ करके जाएंगे ।’, असे म्हणत तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन अनेकजण रस्त्यावर उतरले. हिंदूंना शिवीगाळ केली. काही धर्मांध महिलांनी बुरख्याआड काठ्या लपवून आणल्या. काही धर्मांध हे हिंदु महिलांवर मानसिक दडपण आणण्याच्या उद्देशाने ‘मारून टाकू, कापून टाकू’, असे म्हणत दुचाकीवरून गल्लीबोळात हिंडत होते. या घटनेपूर्वी उर्दू शाळा, मदरसे यांतील मुलांना नियोजनपूर्वक घरी सोडण्यात आले. त्यानंतर हा प्रकार घडला.

आता धुळ्यातील घटना पाहू. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धुळे विभागप्रमुख तथा गोरक्षक श्री. संजय शर्मा आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या प्रभावी गोरक्षणामुळे धुळे येथील अवैध पशूवधगृहांवर प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. शहरातील गोमांस निर्यात ठप्प झाली. यामुळे एका धर्मांधाने श्री. शर्मा आणि हिंदु धर्म अन् देवता यांची विटंबना करणारा एक व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केला. पोलिसांनी संबंधित धर्मांधासह काही गोरक्षकांना कह्यात घेतले आहे. गोरक्षकांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ १५ जुलै या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने धुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

पाळधी येथील घटना ही खरच घडली आहे की हिंदूंच्या विरोधात रचलेले षड्यंत्र आहे, हे शोधायला हवे ! अनोळखी व्यक्ती ही हिंदूच आहे, हे कशावरून ठरवायचे ? घटनेचे पडसाद तात्काळ उमटायला हवे होते. १० जुलै या दिवशी घटना घडलेली असतांना धर्मांध ११ जुलै या दिवशी पोलीस ठाण्यात का आले ? हिंदु धर्म, देवता यांची विटंबना केल्यास आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही, हा उद्दामपणा धर्मांधांमध्ये येतो कसा ? राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांना प्राण धोक्यात घालून गोरक्षण का करावे लागते ?, यांचीही उत्तरे मिळायला हवीत. उपरोक्त दोन्ही घटनांमध्ये धर्मांधांचा कावेबाजपणा लक्षात येतो. हिंदूंनी वेळीच जागृत होऊन संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF