लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे महिलेच्या मृत्यूनंतर धर्मांधांकडून रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण

पोलिसांनी धर्मांधांना अटक करण्याऐवजी घरी जाऊ दिले !

  • धर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस !
  • देशात अनेक ठिकाणी धर्मांधांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना घडत असतांना याविषयी एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत; मात्र कथित ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून मारहाण झाल्याची आवई उठवणार्‍या धर्मांधांच्या बाजूने लगेच हे सर्वजण बोलू लागतात, हे लक्षात घ्या !
  • धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना घरी जाऊ देणार्‍या संबंधित पोलिसांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील ‘केजीएमयू’ (किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी) रुग्णालयात सायरा बानो या महिलेचा मृत्यू झाल्यावर ५० हून अधिक धर्मांधांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना १२ जुलैच्या रात्री घडली. हिंसाचार झाल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी धर्मांधांना अटक करण्याऐवजी त्यांना समजावून घरी पाठवून दिले.

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF