कुलभूषण जाधव यांच्या सुटकेवर आज निर्णय

नवी देहली – पाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या, १७ जुलैला निकाल देणार आहे. हा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

पाकच्या सैनिकी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाच्या अंतर्गत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिल्यावर मे २०१७ मध्ये या न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच निर्णय सुरक्षित ठेवला होता. पाकचे म्हणणे होते की, मार्च २०१६ मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून कह्यात घेण्यात आले होते. भारताने म्हटले की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF