भटिंडा (पंजाब) येथे गोशाळेचे छप्पर कोसळल्याने १०० हून अधिक गायी दबल्याची शक्यता

भटिंडा (पंजाब) – १६ जुलै या दिवशी येथे असलेल्या एका गोशाळेचे छप्पर  कोसळल्याने त्याखाली १००हून अधिक गायी दबल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर काही गायींना सुखरूप वाचवण्यात आले असून काही गायी घायाळ झाल्या आहेत; मात्र गायीचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. गोशाळेचे छप्पर कमकुवत झाले होते आणि त्यावर पावसाचे पाणीही जमा झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF