साधकांनो, परम पूज्यांनी दिलेली ज्ञानगंगा प्रवाहित करा !

गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचा संदेश

प.पू. आबा उपाध्ये

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !

‘साधकहो, परम पूज्यांकडून (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून) आपणांस जी ज्ञानगंगा मिळाली, ती पुढे प्रवाहित करा. ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळते आणि तोच सागर दक्षिणेस तीन सागरांत विलीन होतो अन् सृष्टीला स्पर्श करतो, त्याप्रमाणे साधकांनी ही ज्ञानगंगा प्रवाहित केली की, सनातन धर्माची पताका विश्‍वभर फडकेल आणि मग जगाला कळेल की, पूर्वापार चालत आलेला हाच खरा सनातन धर्म ! ‘असे होवो’, अशी भगवान श्रीकृष्ण, विष्णुदेव, परम पूज्य, तसेच माझे सद्गुरु सदानंद स्वामी आणि शिवलोकात असलेली माझी धर्मपत्नी यांच्याकडे प्रार्थना ! भगवंत आणि सर्वश्रेष्ठ सद्गुरु यांच्यापुढे मी नतमस्तक आहे.’

– प.पू. आबा उपाध्ये


Multi Language |Offline reading | PDF