‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेविषयी आश्‍वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी आवश्यक संतांची १०० ही संख्या पूर्ण : सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १०२ संत विराजमान

‘सध्याची राष्ट्र आणि धर्म यांची अतिशय विदारक असलेली स्थिती दूर करण्यासाठी ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’, हाच एकमेव उपाय आहे, हे सांगणारे आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेविषयी मार्गदर्शन करणारे जगात एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेविषयी जे सांगितले होते, ते कालांतराने सत्य ठरले आहे. यातून त्यांचे द्रष्टेपण आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील त्यांचा असामान्य अधिकारही लक्षात येतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी जणू राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेविषयी आश्‍वस्तच केले आहे ! स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या देशभक्तांना ‘देश कधी स्वतंत्र होईल’, याची कोणतीही निश्‍चिती नसतांनाही ते प्राणपणाने लढले. याउलट आता परात्पर गुरु डॉक्टरांनी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेची निश्‍चिती दिली असल्याने राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी साधनेद्वारे अधिक आत्मविश्‍वासाने प्रयत्न करू शकतात.

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्य कसे असते’, याचीही प्रचीती त्यांच्या ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेविषयीच्या कथनावरून येते. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा ठेवून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी तळमळीने प्रयत्न केले, तर अखिल मानवजातीसाठी आनंददायी ठरेल असे ईश्‍वरी राज्य स्थापन तर होईलच, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची आध्यात्मिक उन्नती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तही होतील.

परात्पर गुरु डॉक्टरांचा ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या संदर्भातील कृतज्ञताभाव !

‘वर्ष १९९८ मध्ये गुरूंच्या कृपेमुळे माझ्या मनात ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचा विचार आला. त्यानुसार कार्याला आरंभ केला. आता गुरूंच्या आशीर्वादामुळे दिवसेंदिवस हे कार्य पुष्कळ प्रमाणात वाढत आहे. नाडीपट्ट्यांच्या माध्यमांतून थोर महर्षि, तसेच सूक्ष्मातील जाणणारे काही संत, भविष्यवेत्ते आणि नाडीपट्टी-वाचक यांचेही कार्याला आशीर्वाद आहेत. अनेक संत-महंत आणि धर्माचार्य यांनाही हे कार्य आपले वाटत असून ते कार्याला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देत आहेत. ‘ईश्‍वरी राज्य स्थापन झाल्यानंतर पुढील पिढीत ते कोण चालवील ?’, असा प्रश्‍न मला पडला होता. या प्रश्‍नाचे उत्तरही देवाने गेल्या काही वर्षांत उच्च लोकांतील अनेक जिवांना पृथ्वीवर जन्माला घालून दिले आहे. ही दैवी बालके जन्मतःच चांगल्या आध्यात्मिक पातळीची आहेत. ५ जुलै २०१९ पर्यंत अशी ९६७ दैवी बालके असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.

थोडक्यात ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना होण्यासाठी आवश्यक ते सर्व गुरु आणि देव देत आहे’, हे वरील विवेचनावरून लक्षात येते. यासाठी मी गुरु आणि देव यांच्याप्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. संदीप आळशी

१. वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापन होणार असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्येच सांगितलेले असणे आणि पुढे नाडीभविष्याच्या माध्यमांतून ‘ईश्‍वरी राज्य’ लवकरच स्थापन होणार असल्याचे समजणे

१ अ. ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापन होईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष १९९८)

१ आ. नाडीभविष्याच्या (टीप) माध्यमांतून सप्तर्षींनी ‘ईश्‍वरी राज्य लवकरात लवकर येणार आहे’, असे सांगणे : ‘ईश्‍वरी राज्य लवकरात लवकर येणार आहे. आपण (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आतापर्यंत जे कार्य हाती घेतले आहे, त्यात आपल्याला विजयच मिळाला आहे. आपल्यापासूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे. ईश्‍वरी राज्यही आपल्यामुळेच येईल.’ [संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीवाचन क्र. ८०, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१६)]

टीप – नाडीभविष्य : शिव-पार्वती यांच्यात अखिल मानवजातीच्या संदर्भात झालेला संवाद सप्तर्षि आणि महर्षि यांनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीपट्ट्यांवर लिहून ठेवलेले हे भविष्य म्हणजे ‘नाडीज्योतिषशास्त्र’. सहस्रो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे.

२. ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी १०० संतांची, तसेच ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या ५०० साधकांची आवश्यकता आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१० मध्ये सांगितलेले असणे

२ अ. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी १०० संतांची, तसेच ६० ते ६९ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठलेल्या ५०० साधकांची आवश्यकता आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात.’ – एक विद्वान, १.१२.२०१० [सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.]

२ आ. ईश्‍वरी राज्याची स्थापना करण्यासाठी आवश्यक असलेले ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे बळ ! : ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज मिळावे, या उद्देशाने समष्टी कार्य (टीप १) करणारे १०० संत, तसेच ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत ५ लक्ष राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी (टीप २) यांची आवश्यकता आहे. वर्ष २०२० पर्यंत सनातन संस्थेचे १०० साधक संत होतील. त्यामुळे ‘वातावरणातील रज-तमाचे प्रमाण घटणे, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांना आध्यात्मिक बळ मिळणे’, या गोष्टी साध्य होतील (टीप ३). त्यामुळे ईश्‍वरी राज्याची स्थापना करणे शक्य होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.४.२०१३) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)

टीप १ – समष्टी कार्य : ईश्‍वरी राज्य स्थापनेसाठी हिंदूसंघटन, धर्मजागृती आदी करणे, हे समष्टी कार्य आहे. या कार्याला आध्यात्मिक बळ प्राप्त करून देण्यासाठी प्रार्थना आणि नामजप करणे, हेही समष्टी कार्यच आहे.

टीप २ – संतांच्या संकल्पामुळे ही आवश्यक संख्या योग्य वेळी पूर्ण होईल.

टीप ३ – काळोखात दिव्याच्या प्रकाशाचा उपयोग होतो; मात्र दाट धुक्याच्या आवरणात दिव्याचा प्रकाशही निष्प्रभ ठरतो. त्याचप्रमाणे सध्याच्या रज-तमात्मक गुणांच्या आवरणात स्वतःच्या साधनेची क्षमता कार्यासाठी पुरेशी वापरता येत नाही. संतांच्या आध्यात्मिक बळाच्या प्रभावाने हे आवरण घटल्यास ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या कार्यक्षमतेचा वापर अधिक चांगला होऊ शकेल.

२ इ. जुलै २०१९ मधील सनातनच्या संतांची संख्या

(टीप – सनातनचे बालक संत : पू. भार्गवराम प्रभु, हे सनातनचे पहिले बालक संत आहेत. ‘भावी आपत्काळात साधकांना मार्गदर्शन आणि त्यांचे रक्षण करणे एवढेच यांचे कार्य नाही, तर ईश्‍वरी राज्य स्थापन झाल्यानंतर सर्वत्र ईश्‍वरी राज्याची घडी बसवण्याचे कार्यही ते करणार आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.९.२०१८)

२ ई. जुलै २०१९ मधील ६० ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले सनातनचे साधक आणि बालसाधक यांची संख्या

टीप : महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या दैवी बालकांची पातळी जन्मतःच ६० टक्क्यांपेक्षा अधिक असते. उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या दैवी बालकांची पातळी जन्मतःच ५० ते ५९ टक्के असते आणि अशा बालकांनी साधना केल्यामुळे त्यांची पातळी लवकरच ६० टक्क्यांपेक्षा अधिक होते.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (५.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF