परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्य करणार्‍या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे एकलव्याप्रमाणे साधना करणारे सद्गुरु आणि संत !

सद्गुरु सिरियाक वाले, युरोप

सद्गुरु सिरियाक वाले

‘सद्गुरु सिरियाक वाले हे गत १८ वर्षांपासून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या माध्यमातून साधना करत आहेत. ते देश-विदेशातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. नम्रता, निरागसता, तत्त्वनिष्ठता, समष्टी भाव आणि शरणागत भाव या गुणांमुळे त्यांनी जलदगतीने आध्यात्मिक प्रगती केली अन् १२.३.२०१३ या दिवशी ते ‘संत’ झाले. साधनेच्या आंतरिक तळमळीला आणि ईश्‍वराप्रती असलेल्या ओढीला ‘प्रांत, भाषा, देश, धर्म किंवा संस्कृती या कशाचेच बंधन नसते’, हे पू. सिरियाक वाले यांनी स्वतःच्या उदाहरणावरून सिद्ध करून दाखवले. त्यांचे उदाहरण अत्यंत दुर्मिळ असून ‘एक मॉडेल’ ते ‘एक संत’ आणि ‘एक संत’ ते ‘समष्टी सद्गुरु’ असा त्यांचा जलदगतीने झालेला आध्यात्मिक प्रवास जगभरातील सर्व साधकांसाठी अत्यंत स्फूर्तीदायी आहे.

पू. रेन्डी इकारांतियो, इंडोनेशिया

पू. रेन्डी इकारांतियो

‘पू. रेन्डी इकारांतियो हे इंडोनेशियातील असून ते ३७ वर्षांचे आहेत. ते सतत भावावस्थेत असतात. ते सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्यामुळे साधकांना त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते आणि त्यांची भावजागृती होते. ते वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत, तसेच त्यांना कौटुंबिक दायित्वही आहे. असे असतांनाही साधनेसाठी अधिकाधिक वेळ देण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. ईश्‍वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे ते ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांचा आधारस्तंभ बनले आहेत. मागील ६ वर्षे ते साधना करत असून त्यांनी अल्प कालावधीत साधनेत प्रगती केली. नम्रता, प्रीती, शिकण्याची वृत्ती, शांत, स्थिर आणि अहं अल्प असणे इत्यादी दैवी गुण हे पू. रेन्डी इकारांतियो यांचे वैशिष्ट्य आहे.

पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका

पू. (सौ.) भावना शिंदे

पू. (सौ.) भावना शिंदे या वर्ष १९९९ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्या आणि तेव्हापासून त्यांच्या साधनेचा प्रवास चालू झाला. त्यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत खडतर असूनही, तसेच तीव्र आध्यात्मिक त्रासाशी लढून त्यांनी तळमळीने साधना केली. व्यष्टी आणि साधना करण्यास उत्सुक असलेल्या अमेरिकेतील जिज्ञासूंना त्या मार्गदर्शन करतात. अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाच्या आणि सर्व साधकांसाठी आदर्श असलेल्या पू. (सौ.) भावनाताई या एकमेव संत आहेत.’

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर, न्यू जर्सी, अमेरिका

पू .(सौ.) शिल्पा कुडतरकर

गुरुसेवेची आणि ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ असलेल्या मूळच्या गोव्यातील पू. (सौ.) शिल्पा कुरतडकर यांनी अमेरिकेत गेल्यावरही अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू ठेवले अन् ‘अमेरिकेसारख्या रज-तमाचे आधिक्य असलेल्या ठिकाणी राहूनही समष्टी साधना चांगल्या प्रकारे कशी करता येते ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. न्यू जर्सी, अमेरिका येथील त्यांचे राहते घर म्हणजे एस्.एस्.आर्.एफ्.चे सेवाकेंद्रच बनले आहे. तेथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळा होतात, तसेच साधकही वास्तव्याला असतात.’

 


Multi Language |Offline reading | PDF