इंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव

इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १४ ते १६ जुलै २०१९ या कालावधीत येथील भक्तवात्सल्याश्रमात श्री गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा सोहळा हा ‘स्त्री शक्ती’ संचलित असणार आहे.
१४ आणि १५ जुलै या दिवशी विविध कार्यक्रम, भजने आदी झाले. १६ जुलै या दिवशी सकाळी साडेआठ वाजता श्री व्यासपूजन आणि श्री सत्यनारायण पूजन, संत भक्तराज स्तवन मंजिरी आणि प.पू. रामानंद बावनी सादर होऊन सकाळी १०.३० वाजता श्रीगुरूंचे पादुकापूजन अन् दर्शनसोहळा होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादानंतर या महोत्सवाची सांगता होणार आहे. ‘अधिकाधिक भक्तांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

महोत्सवासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन

या महोत्सवासाठी आर्थिक सहकार्य करायचे असल्यास ‘बँक ऑफ बडोदा, अन्नपूर्णारोड शाखा, बचत खाते क्रमांक : ३१७४०१००००१३४८ IFS Code : BARB0ANNAPU मध्ये जमा करून श्री. हेमंत पंचभाई यांना ९८९३४६७९५८ या क्रमांकावर किंवा संस्थेला संगणकीय पत्र पाठवून सूचित करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF