मोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव

  • हिंदुबहुल वस्तीत एखाद्या मुसलमानाला घर नाकारल्याच्या कथित घटनेवरून हिंदूंना लक्ष्य करणारे हिंदुद्वेषी पुरोगामी, प्रसारमाध्यमे, धर्मांध, डावे आता गप्प का ?
  • जाती-धर्माच्या नावाखाली भेदभाव करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात मायावती किंवा मुलायमसिंह यादव का बोलत नाहीत ?

मोरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे भोजपूरच्या पीपलसाना गावामध्ये एका मुसलमान व्यक्तीच्या केशकर्तनालयामध्ये गावातील वाल्मीकि समाजाचे काही तरुण केस कापून घेण्यासाठी गेले असता मुसलमान व्यक्तीने सदर तरुण कनिष्ठ जातीचे असल्याने त्यांचे केस कापण्यास नकार दिला. यावरून वाल्मीकि समाजातील लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. याविषयी त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर त्यांनी दोन्ही पक्षांची बैठक घेऊन त्यांच्यात समेट घडवून आणला. (हिंदूंनी असा नकार जर अन्य धर्मियांना दिला असता, तर पोलिसांनी अशी बैठक घेतली असती का ? त्यांनी हिंदूंवर तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकले असते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF