मोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक

  • ‘जय श्रीराम’ न म्हणणार्‍यांना मारहाण केल्याच्या कथित घटनांवरून हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे अशा घटनांवर मात्र मौन बाळगतात !
  • अशा गुन्ह्यांच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच गुन्हेगारांचे फावते आहे ! पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते, तसाच कायदा भारतातही केला पाहिजे !

मोहाली (पंजाब) – येेथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करत ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या तहजीव आणि आरिफ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. यांपैकी आरिफ याला अटक करण्यात आली, तर तहजीव पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश दत्त आणि राजीव कुमार यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. तहजीव आणि आरिफ दोघेही उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. ते येथे भाड्याच्या घरात रहात होते. आरिफने हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केला होता. त्यानंतर येथील एक तरुणाने तहजीव याला ओळखले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF