पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र

चंडीगड (पंजाब) – पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. ‘या त्यागपत्रास सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद कारणीभूत आहेत’, असे म्हटले जात आहे. सिद्धू यांनी १० जून  या दिवशीच त्यागपत्र दिले होते; मात्र त्याचा खुलासा आता त्यांनी केला. सिद्धू यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. ‘पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना लवकरच माझे त्यागपत्र देणार आहे’, असे यात त्यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF